- 5.30 AM - अखेर सात वर्षांनी मिळाला न्याय; निर्भयाच्या चारही दोषींना लटकवले फासावर
- 5.28 AM - गुन्हेगारांना फाशीगृहामध्ये आणल्यानंतर त्यांचे पाय बांधण्यात आले, आणि फाशीचा दोर गळ्यात घालण्यात आला..
- 5.26 AM - कारागृह अथॉरिटीच्या माहितीनुसार, चारही आरोपींना फाशी देण्याच्या ठिकाणी आणण्यात आले...
- 5.12 AM - कारागृहाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली, काही क्षणातच होणार गुन्हेगारांना फाशी
- 4.55 AM - कारागृह अथॉरिटीच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी केलेल्या फिटनेस चाचणीमध्ये गुन्हेगार निरोगी असल्याचे निष्पन्न..
- 4.48 AM - गुन्हेगारांच्या प्रकृतीची चाचणी करण्यासाठी डॉक्टर पोहोचले कारागृहामध्ये..
- 4.43 AM - तिहार कारागृहाच्या बाहेर नागरिकांची गर्दी..
- 4.30 AM - तिहार कारागृहात अधिकारी आणि जल्लाद यांच्यात बैठकीला सुरूवात.. तुरूंगातील अधिकाऱ्यांची माहिती
- 4.15 AM - निर्भया बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना होणार फाशी, कारागृह प्रशासनाकडून तयारीला सुरूवात
- 4:00 AM- कारागृहाच्या मॅन्युअलनुसार चारही कैद्यांना एक एक करून उठवले जाईल. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडेल.
-
3.15 AM- आरोपींच्या फाशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
अखेर सात वर्षांनी मिळाला न्याय; निर्भयाच्या चारही दोषींना लटकवले फासावर - निर्भयाच्या आरोपींना फाशी
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. फाशी देण्याच्या काही तासांपूर्वीच दोषींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. अखेर सात वर्षांनी निर्भयाच्या चारही दोषींना तिहार कारागृहामध्ये फासावर लटकवले गेले.
LIVE: निर्भया प्रकरणी चारही आरोपींना होणार फाशी, कारागृह प्रशासनाकडून तयारीला सुरूवात
नवी दिल्ली -निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. फाशी देण्याच्या काही तासांपूर्वीच दोषींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. अखेर सात वर्षांनी निर्भयाच्या चारही दोषींना तिहार कारागृहामध्ये फासावर लटकवले गेले.
Last Updated : Mar 20, 2020, 10:30 AM IST