महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण  : दोषी पवन गुप्ताच्या याचिकेवरील सुनावणी आजच होणार - निर्भया प्रकरण खटला

पवन गुप्ता याने काल न्यायालयात धाव घेतली होती. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो, त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी त्याची मागणी आहे.

Nirbhaya Case - Hearing on Pawan Gupta will be on 24th Jan
निर्भया प्रकरण  : दोषी पवन गुप्ताच्या याचिकेवरील सुनावणी होणार २४ जानेवारीला

By

Published : Dec 19, 2019, 11:49 AM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ता याच्या याचिकेवरील सुनावणी आजच होणार असल्याचे दिल्ली न्यायालयाने स्पष्ट केले.

गुप्ता याच्या वकिलांनी या प्रकरणात आणखी काही ताजे पुरावे गोळा करण्यासाठी वेळ मागितली होती. त्याला मान्यता देत, दिल्ली न्यायालयाने पुढील सुनावणी २४ जानेवारी २०२०ला होईल असे जाहीर केले होते. मात्र, या निर्णयावर निर्भयाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय मागे घेत, आजच या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.

गुप्ता याने काल न्यायालयात धाव घेतली होती. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो, त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी त्याची मागणी आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक दोषी अक्षय कुमार सिंह याची फाशीच्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयानंतर निकालाचे पुनवरालोकन करण्यासाठी, आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत त्याला देण्यात आली आहे.

'निर्भया' पॅरामेडिकलची विद्यार्थिनी होती. १६ डिसेंबर २०१२ ला तिचे अपहरण करून बलात्कार करून तिला ठार करण्यात आले होते. या प्रकरणात ६ जण दोषी होते. यापैकी अल्पवयीन गुन्हेगाराला किशोर गुन्हेगारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. इतर पाच जणांपैकी एकाने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. तर, उर्वरित चौघांना न्यायालयाने २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. या ४ जणांना तत्काळ फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

हेही वाचा : 'निर्भया' प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली, राष्ट्रपतींकडे करणार दयेचा अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details