नवी दिल्ली -निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज (शुक्रवार) सकाळी फाशी देण्यात आली. तब्बल 7 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आरोपींना फासावर लटकावण्यात आले आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये दोषींनी तुरुंगामध्ये काम करून तब्बल 1 लाख 37 हजार रुपये कमावले होते.
निर्भया दोषींनी तिहार तरुंगामध्ये कमावले 'इतके' रुपये - निर्भया प्रकरण
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना आज (शुक्रवार) सकाळी फाशी देण्यात आली. गेल्या 7 वर्षांमध्ये दोषींनी तुरुंगामध्ये काम करून तब्बल १ लाख ३७ हजार रुपये कमावले होते.

तुरुंगामध्ये कैद्यांना काम करावे लागते. तसेच त्यांना तुरुंगातील नियामांचे पालन करणे बंधनकारक असते. गेल्या 7 वर्षांमध्ये निर्भयाच्या दोषींनी तरुंगामध्ये काम करून लाखोची कमाई केली आहे. अक्षयने 69 हजार, विनयने 39 हजार तर पवनने 29 हजार रुपये कमावले आहेत. यामध्ये दोषी मुकेशने काहीच काम केले नव्हते. हे पैसै दोषींच्या कुटुंबाला सोपवण्यात येणार आहेत.
दरम्यान दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता. तेव्हापासून दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी निर्भयाचे कुटुंबीय आणि संपुर्ण देश वाट पाहत होता. अखेर 7 वर्षांनंतर दोषींना फासावर लटकवण्यात आले. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते.