नवी दिल्ली- निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी आज फेटाळली होती. त्यानंतर आता आणखी एक आरोपी पवन याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.
गेल्या २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती. १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने यावर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात आपण आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पवनच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.