नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी एकामागोमाग एक राष्ट्रपतींकडे दया याचिका करत असल्याने त्यांची फाशी लांबणीवर पडत आहे. दोषी विनय शर्मानंतर आता अक्षय ठाकुरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : राष्ट्रपतींनी दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळली
राष्ट्रपतींनी आजच दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळली. त्यानंतर आता अक्षय ठाकुरनेही याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. १६ डिसेंबर २०१२ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी ११ मार्च २०१३ मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.
हेही वाचा - 'शाहिनबागेतील आंदोलकर्त्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार'