महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : अखेर वेळ ठरली... दोषींना 3 मार्चला फाशी - nirbhaya rape case

निर्भया प्रकरणातील दोषींना तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

nirbhaya case
निर्भया प्रकरणातील दोषींना तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

By

Published : Feb 17, 2020, 4:21 PM IST

Updated : Feb 17, 2020, 4:42 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींना तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या खटल्यासंदर्भात तारीख जाहीर केली आहे. या आधी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

डिसेंबर 2012 मध्ये 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

Last Updated : Feb 17, 2020, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details