महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नीरव मोदीची सलग चौथी जामीन याचिका लंडन न्यायालयाने फेटाळली - UK court

नीरव मोदी याला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली असून तो ८६ दिवसांपासून वांड्सवर्थ तुरुंगात जेरबंद आहे.

नीरव मोदी

By

Published : Jun 12, 2019, 3:37 PM IST

नवी दिल्ली - नीरव मोदी याची चौथी जामिन याचिकाही आज लंडनच्या वेन्समिन्स्टर न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याआधी मोदी याने ३ वेळेस याचिका दाखल केली होती. नीरव मोदीला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

इंग्लंडचे उच्च न्यायालय 'रॉयल कोर्टस ऑफ जस्टिस'मध्ये मंगळवारी मोदीच्या याचिकेवरील पूर्ण सुनावणी झाली आहे. मोदीच्या वकिलांनी वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात सलग तीन वेळा जामिन नाकरला होता. त्या विरोधात मोदींने न्यायलयात दाद मागिणारी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मोदीचे वकील बॅ. क्लेयर मोंटगोमरी म्हणाले, भारत सरकारने दावा केलेल्या गुन्ह्यातील ते आरोपी नाहीत. खूप वर्षांपासून नीरव मोदी हे हिरे डिझाईनर आहेत. त्यांना प्रामाणिक आणि विश्वासू मानले जाते, असे त्यांनी न्यायलयात सांगितले. मात्र, त्याचा काही एक परिणाम न्यायालयावर झाला नाही. शिवाय ही याचिका फेटाळून लावली. त्याच बरोबर वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयातचा मोदीला अटक करण्याचा निर्यम कायम ठेवला.

ABOUT THE AUTHOR

...view details