लंडन (यु.के) - फरार हिरे व्यापारी नीरव मोदी हा उद्या व्हिडीओ लिंकद्वारे इंग्लंडमधील न्यायालयात दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला हजर राहणार आहे. नीरव मोदीवर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकमध्ये २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
नीरव मोदीला २० मार्च २०१९ला लंडनमध्ये अटक करण्यात आली होते. डिसेंबरमध्ये त्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून तो लंडनच्या वॉन्डस्वर्थ तुरुंगात आहे. त्याच्यावर वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. युकेतील क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसतर्फे भारत सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यात येत आहे.
मोदी याच्या प्रत्यर्पण प्रकरणाची सुनावणी पहिल्या टप्प्यात मे महिन्यात जिल्हा न्यायाधीश सॅम्युअल गुजी यांच्या समोर झाली होती आणि दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सध्या सुरू असून ती शुक्रवारी (११ सप्टेंबर) संपुष्टात येणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश साम्युअल गुझी यांनी नीरव मोदीला कारागृहातील एका खोलीतून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात सीपीएसने नीरव मोदीविरुद्ध फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा खटला दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर भारत सरकारने केलेल्या आरोपांसबंधी सबळ पुरावे दिल्यानंतर या सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे.
हेही वाचा-बिहार: नालंदा जिल्ह्यात प्रवासी बस उलटली...३५ जण जखमी