महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नोटबंदीचा ९६ कामगारांना फटका, अमरावतीत जाधव ग्रुपने केली कामगार कपात - jadhav-industrial-group

आमची कंपनी नफ्यात सुरू असतानाही कंपनी इतरत्र विलिन करून आम्हाला कामावरून काढण्यात आले. हा आमच्यावर अन्याय असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. जाधव उद्योग समूहाचे मालक संजय जाधव यांनी त्यांच्या चालू असणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये आम्हाला सामावून घ्यायला हवे होते, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

नोटबंदीचा ९६ कामगारांना फटका

By

Published : Mar 6, 2019, 10:26 AM IST

अमरावती - शहरातील जाधव इंडस्ट्रीयल ग्रुपच्या ९६ कामगारांना एकाच दिवशी कामावरून काढण्यात आले. नोटबंदीमुळे उद्योग अडचणीत आल्याचे कारण जाधव ग्रुपने दिले आहे. अचानक कोसळलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे ९६ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

नोटबंदीचा ९६ कामगारांना फटका


अमरावती औद्योगिक वसाहतीमध्ये जाधव ग्रुपचे जाधव गेअर्स, जाधव लेलॅन्ड आणि जाधव ग्रुप्स जाधव गेअर्स युनिट दोन आणि जाधव गेअर्स डब्ल्यू २७ असे चार युनिट आहेत. यापैकी जाधव गेअर्स डब्ल्यू २७ हे युनिट कायमस्वरूपी बंद करून या युनिटमध्ये गत २२ वर्षांपासून काम करणाऱ्या ९६ कामगारांना १ मार्च पासून घरी पाठविण्यात आले आहे. २२ वर्षांपासून काम करून आम्ही कंपनीला कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवून दिला. आमची कंपनी नफ्यात सुरू असतानाही कंपनी इतरत्र विलिन करून आम्हाला कामावरून काढण्यात आले. हा आमच्यावर अन्याय असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. जाधव उद्योग समूहाचे मालक संजय जाधव यांनी त्यांच्या चालू असणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये आम्हाला सामावून घ्यायला हवे होते, असेही कामगारांनी म्हटले आहे.


आज विजय धोंगळे यांच्या नेतृत्वात कामगारांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. संजय जाधव यांनी नोटबंदीचे खोटे कारण देऊन कंपनी बंद केली, असा आरोप या निवेदनातकेला आहे. जाधव उद्योग समूहाच्या इतर कंपन्यांत आम्हाला सामावून घ्या, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा कामगारांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details