श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दोन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्यात येणार आहेत. आज जम्मूमधील एम्स उभारणीसाठी जमिनीचे भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची उपस्थिती होती.
जम्मू काश्मीरमध्ये 2 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारणार - AIIMS SANCTIONED FOR JAMMU
जम्मूमधील एम्स उभारणीसाठी जमिनीचे भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची उपस्थिती होती.
जम्मू काश्मीरमध्ये 2 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि 9 वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. एक एम्स हे जम्मूमध्ये तर दुसरे श्रीनगरमध्ये उभारण्यात येणार आहे. फेब्रुवरी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूमधील एम्सचा (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) शिलान्यास केला होता.
जम्मूमधील विजयपूर येथे आणि पुलवामामधील अवंतीपूरा येथे एम्स स्थापन करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. याचे संपूर्ण काम ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याचा प्रस्ताव आहे.