नवी दिल्ली -जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या आणि फुटीरतावादी नेता यासीन मलिक याच्या न्यायालयीन कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. टेरर फंडीग प्रकरणी आज दिल्ली एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यासीन मलिकच्या न्यायालयीन कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ - NIA filed charge-sheet \against Yasin Malik
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या आणि फुटीरतावादी नेता यासीन मलिक याच्या न्यायालयीन कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) आज आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये शब्बीर अहमद शाह आणि अनेक फुटीरतावादी नेत्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना टेरर फंडिंग प्रकरणात याच वर्षी एप्रिल महिन्यात यासीन मलिकला अटक करण्यात आली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून मलिक अटकेत आहे.
यासीन मलिक याच्यावर १९८९ मध्ये तत्कलीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईदचे अपहरण आणि १९९० मध्ये भारतीय हवाई दलाच्या चार जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनांनंतर मलिकच्या जेकेएलएफ या संघटनेवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली आहे.