महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

साध्वी प्रज्ञा सिंहला आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - mp

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह ६ आरोपींना दहशतवादी कारवाया, गंभीर गुन्ह्यांचे कट रचणे, हत्या आणि इतर प्रकरणात दोषी ठरवले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह

By

Published : Jun 3, 2019, 3:39 PM IST

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी प्रज्ञा ठाकूर हिला आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने हा आदेश दिला. याआधीही मे महिन्यात न्यायालयाने असे आदेश दिले होते. मात्र, स्वाध्वीने त्याला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आता हे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणातील आरोपी सुनावणीसाठी न्यायालयात हजर नसल्याने न्यायलयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य ६ आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्यासंबंधी आदेश दिले होते. याशिवाय ठोस कारण असल्याशिवाय गैरहजर राहता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते.

या ७ आरोपींवर दहशतवादी कारवाया, गंभीर गुन्ह्यांचे कट रचणे, हत्या आणि इतर प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यांच्यावर भारतीय दंड विधान आणि विस्फोटक पदार्थ अधिनियमाच्या नियमानुसार आरोप ठेवण्यात आले आहे. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ साली एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details