नवी दिल्ली - वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्यावर चेन्नईतील तरुणीच्या अपहरण कटात सहभागी असल्याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुन्हा दाखल केला आहे. चेन्नईच्या तरुणीचे बांगलादेशातील टोळीने लंडन येथून अपहरण केले होते. त्यानंतर त्या तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
चेन्नईतील तरुणीच्या अपहरण प्रकरणी झाकीर नाईकवर गुन्हा दाखल
मुलीच्या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याच्या प्रकरणात धार्मिक उपदेशक झाकीर नाईकवर राष्ट्रीय तपास संस्थेने गुन्हा दाखल केला आहे. चेन्नईच्या मुलीचे बांगलादेशातील टोळीने अपहरण केले होते.
चेन्नईतील तरुणी उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली होती. तिथे तिला बांगलादेशी टोळक्याने सापळ्यात अडकवून तिचे अपहरण केले. त्यानंतर या तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्मात धर्मांतर केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे.
तरुणीच्या अपहरण प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने बांगलादेशातील टोळीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बांगलादेशातील बड्या नेत्याच्या मुलाचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर धार्मिक उपदेशक झाकीर नाईकचे नाव पुढे आले आहे. नाईक सध्या मलेशियात वास्तव्यास आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास संस्थेने झाकीर नाईकचा या प्रकरणात काय सहभाग आहे, याबाबत तपास सुरू केला आहे.