श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (एनआयए) शुक्रवारी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.
जैशच्या सांगण्यावरून पुलवामा हल्ल्यासाठी जमवली केमिकल्स, दोन दहशतवाद्यांना अटक - Jaish e Mohammed
एनआयएने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोघांवर आयईडी बॉम्ब बनवण्यासाठी केमिकल्स जमा केल्याचा आणि कटात सहभागी झाल्याचा आरोप आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यांवर हा कट रचण्यात या दोन दहशतवाद्यांनी सहभाग घेतल्याचे एनआयएने म्हटले आहे.
जैशच्या सांगण्यावरून पुलवामा हल्ल्यासाठी जमवली केमिकल्स
एनआयएने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोघांवर आयईडी बॉम्ब बनवण्यासाठी केमिकल्स जमा केल्याचा आणि कटात सहभागी झाल्याचा आरोप आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यांवर हा कट रचण्यात या दोन दहशतवाद्यांनी सहभाग घेतल्याचे एनआयएने म्हटले आहे. त्यांना शनिवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात उभे केले जाणार आहे.
हेही वाचा - COVID-19 : गुरुग्राममध्ये आढळला आणखी एक रूग्ण..