महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमधील सुपरवायझर निघाला आयएसआय एजंट; एनआयने ठोकल्या बेड्या - आयएसआय एजंट न्यूज

उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात गोमतीनगर पोलीस स्थानकात आयएसआय एजंट मोहम्मद रशीद विरोधात १९ जानेवारीला गुन्हा नोंद झाला होता. हा आरोपी पाकिस्तानमधील आयएसआय एजंटच्या संपर्कात होता. रशीद हा अनेकवेळा पाकिस्तान गेल्याचे एनआयएला तपासात आढळले होते.

संपादित
संपादित

By

Published : Aug 31, 2020, 4:48 PM IST

Updated : Aug 31, 2020, 5:07 PM IST

अहमदाबाद -राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयएसआय एजंटला गुजरातमधून अटक केली आहे. सुपरवायझरचे काम करत असल्याचे भासविणारा हा आयएसआय एजंट भारताची माहिती पाकिस्तानला पाठवित होता. रझाकभाई कुंभर असे आरोपीचे नाव आहे.

आयएसआय एजंट रझाकला पश्चिमच्या कच्छ भागामधून मुंद्रा येथील त्याच्या घरातून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एनआयला त्याच्या घरात महत्त्वाचे कागदपत्रे सापडली आहे. तसेच काही गोपनीय कागदपत्रेही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहेत.

गुजरातमधील सुपरवायझर निघाला आयएसआय एजंट

असा सापडला आयएसआय एजंट

उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरात गोमतीनगर पोलीस स्थानकात आयएसआय एजंट मोहम्मद रशीद विरोधात १९ जानेवारीला गुन्हा नोंद झाला होता. हा आरोपी पाकिस्तानमधील आयएसआय एजंटच्या संपर्कात होता. रशीद हा अनेकवेळा पाकिस्तान गेल्याचे एनआयएला तपासात आढळले होते. त्याने देशातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो पाकिस्तानला पाठविले होते. तर सुरक्षा दलाबाबतची महत्त्वाची माहितीही या आयएसआय हस्तकाने पाकिस्तानला पाठविली होती. रशीदची चौकशी केली असता पोलिसांना आयएसआय एजंट रझाकची माहिती मिळाली.

रझाकने त्याच्या खात्यावरून रिझवान या व्यक्तीच्या खात्यावर ५ हजार रुपये पेटीएमद्वारे पाठविले होते. रिझवानने हे पैसे पुढे रशीदला पाठविले होते. हे पैसे रशीदला भारताबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पाठविण्यासाठी देण्यात आले होते.

Last Updated : Aug 31, 2020, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details