महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'त्या' एन्काऊंटरच्या चौकशीसाठी एफआयआर करण्याची परवानगी द्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अ‌ॅड. जी. एस. मणी आणि अ‌ॅड. प्रदीप कुमार यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची २०१४ मधील मार्गदर्शक तत्त्वे न पाळता हे एन्काऊंटर करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) पथक चौकशीसाठी हैदराबादला आले आहे.

'त्या' एन्काऊंटरच्या चौकशीसाठी
'त्या' एन्काऊंटरच्या चौकशीसाठी

By

Published : Dec 7, 2019, 12:26 PM IST

नवी दिल्ली - हैदराबादमध्ये पशुवैद्य तरुणी 'दिशा'वर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आणि तिचा मृतदेह जाळून टाकणारे चार गुन्हेगार पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. या प्रकरणी या एन्काऊंटरविषयी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आयोगातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अ‌ॅड. जी. एस. मणी आणि अ‌ॅड. प्रदीप कुमार यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची २०१४ मधील मार्गदर्शक तत्त्वे न पाळता हे एन्काऊंटर करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) पथक चौकशीसाठी हैदराबादला आले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details