नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतरही राष्ट्रीय हरीत लवादाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालणार आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल म्हणजेच एनजीटी कार्यालयाच्या आत येण्यास फक्त कर्मचाऱ्यांना प्रवेश असेल. एनजीटीने नव्याने जारी केलेला आदेश 4 मेपासून लागू होणार आहे.
एनजीटीकडे आलेले खटले वकील आणि पक्षकारांच्या उपस्थितीविनाच पार पडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिगं हाच पर्याय उपलब्ध आहे. जो पक्षकार किंवा वकील एखाद्या प्रकरणाची लवकर सुनावणी करू इच्छित असेल त्यांना आधी judicialngt@nic.in वर ईमेल करावा लागणार आहे.