नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी त्यांच्या 2020 या वर्षाच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे कामकाजाचे दिवस पूर्ण भरलेले नाहीत. ते भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
देशभरात लोकडाऊनची घोषणा झाल्यानंतर लवादाने त्यांचे काम कमी केले आहे. फक्त तातडीच्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. इतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे, असे लवादाने म्हटले आहे.