भौगोलिक संशोधन / जिओग्राफिकल एक्सप्लोरेशन सुलभ करणारी नवीन तंत्रज्ञान प्रणाली नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (NGRI) विकसित केली आहे. ही एक ड्रोन आधारित चुंबकीय संशोधन प्रणाली आहे. याद्वारे खनिजे, भूगर्भीय रचना आणि पृथ्वीच्या तळाचे स्थलांतर अभ्यासने / बेसमेंट टोपोग्राफीचे मॅपिंग करणे शक्य होणार आहे. या प्रणालीच्या विकासाचे संपूर्ण डिझाइन एनजीआरआयनेच केले. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होऊन दुर्गम भागात वेगाने संशोधन शक्य होईल, असे सीएसआयआर- एनजीआरआयचे संचालक डॉ. व्ही. एम. तिवारी म्हणाले.
11 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या हीरक महोत्सवी जयंतीनिमित्त डॉ. तिवारी यांची ईनाडूने घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित भाग :
- भौगोलिक संशोधनात तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात उपयोग होतो?
भूजल, खनिजे व हायड्रोकार्बनचा शोध घेण्यास आणि भूकंपाचा झोन शोधण्यात तंत्रज्ञान खूप उपयोगी आहे. आम्ही बर्याच प्रयोगांसाठी चुंबकीय सर्वेक्षण करतो. सुरुवातीला, संशोधक स्वतः खनिजे आणि भूजल शोधत. काही वर्षांपूर्वी आम्ही एका हेलिकॉप्टरच्या मागे मॅग्नेटोमीटर बांधून सर्वेक्षण केले. साहजिकच ती एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. म्हणून, एनजीआरआयने एक ड्रोन किंवा मानव रहित हवाई वाहन (यूएव्ही) आधारित चुंबकीय शोध यंत्रणा विकसित केली. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे हे तंत्रज्ञान वापरले गेले. आम्ही युएव्ही-मॅग्नेटोमीटर वापरुन याचरमचे (हैदराबाद उपनगरातील एक शहर) सर्वेक्षण केले आणि निष्कर्षाअंती येणारे निकाल अचूक होते. या तंत्रज्ञानामुळे दुर्गम डोंगराळ आणि किनारपट्टी भागात भौगोलिक संशोधन करणे अतिशय सुलभ झाले आहे.
- सहा दशकांतील भूकंप लहरींचा अभ्यास कसा होणार आहे?
भूकंपांविषयी अद्याप बरेच निष्कर्ष काढले जाणे बाकी आहे. सध्या, आम्ही केवळ भूकंपाचे झोन आणि थरकापांची तीव्रता ओळखू शकतो. भूकंपांचा अंदाज देईल असे तंत्रज्ञान आम्ही अद्याप विकसित केलेले नाही. भूकंपशास्त्रीय संशोधनात जीपीएस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग ही आधुनिक तंत्रज्ञाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. देशातील जलसाठा वेगाने कमी होत आहे.
- आपल्या संशोधनादरम्यान, पाण्याचे संकट सोडविण्यासाठी कोणत्या धोरणाचा अभ्यास केला आहे का?