मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या अभूतपुर्व यशानंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतवेळेत भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होता. मात्र आता पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे मोठे वक्तव्य शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातून केला आहे. भाजपशी आमची युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. असेही त्या अग्रलेखात म्हटले आहे.
पुढच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच; 'सामना'तून केला दावा - cm
शिवसेना ही एका निर्धाराने पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही येणाऱ्या विधानसभेवर भगवा फडकवू, आणि येणाऱ्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, याच निर्धाराने कामाला लागुया अशी भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून मांडले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपली तत्वे कधीत सोडली नाहीत त्यांनी नेहमी म्हणायचे शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकाकरण करते, त्यामुळे ५३ वर्षे झाली शिवसेना अजूनही कणखरपणे टिकून आहे. शिवसेना ही एका निर्धाराने पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही येणाऱ्या विधानसभेवर भगवा फडकवू, आणि येणाऱ्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, याच निर्धाराने कामाला लागुया अशी भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून मांडले आहे.
आज शिवसेनेच्या वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल याची घोषणा करतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.