दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कळसकरची कबुली, सीबीआयकडून न्यायालयात अहवाल सादर
आज.. आत्ता... (बुधवार २६ जून, दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या) - dabholkar
आज राज्यात दुपारी २ वाजेपर्यंत विविध घडामोडी घडल्या आहेत. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या कळसकरने हत्येची कबुली दिली आहे. तर पावसाळी अधिवेशनात मराठा विद्यार्थ्यांना जातपडताळणीची आवश्यकता नसल्याचे माहिती देण्यात आली आहे. सोन्याचा भाव ३५ हजाराजवळ पोहोचला.
पुणे- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान कळसकर याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी आणि सचिन अंदुरेनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती त्याने सीबीआयला दिली आहे. सीबीआयने याबाबतचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला आहे. ...वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशन : मराठा विद्यार्थ्यांना जातपडताळणीची आवश्यकता नाही
मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले आहे. विधानभवन परिसरात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. अधिवेशनाच्या सुरुवातील लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ११ वाजता सुरू झाले आहे. विधानभवनात प्रश्नोत्तरे सुरू आहेत. ...वाचा सविस्तर
सोन्याचा भाव प्रति तोळा पोहोचला ३५ हजाराजवळ, 'या' कारणाने होतेय भाववाढ
नवी दिल्ली- लग्नसराई आणि अक्षयतृतीया संपूनही सोन्याचा दर गेली सहा दिवस वाढत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजची (एमसीएक्स) सोन्याच्या कंत्राटाची मुदत ऑगस्टमध्ये संपत आहे. अशा स्थितीत सोन्याचा दर ३७० रुपयाने वाढून प्रति तोळा ३४ हजार ८११ रुपये झाला. अमेरिका आणि इराणमधील भौगोलिक-राजकीय तणावांमुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा स्थितीत त्यांनी सुरक्षित गुंतवणुकीकरता सोन्यामधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढविले आहे. ... वाचा सविस्तर
पुणे : प्रियकराचा लग्नासाठी तगादा, प्रेयसीने संबंध तोडल्याने त्याने उचलले 'असे' पाऊल
पुणे- प्रियकराने धारदार शस्त्राने प्रेयसीवर वार केल्याची घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये घडली. यामध्ये प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोर प्रियकर विकास शांताराम शेटे (वय २३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ... वाचा सविस्तर
शाहू महाराजांच्या सिंचन, शिक्षण योजनेवर सरकार काम करणार - चंद्रकात पाटील
कोल्हापूर- राजर्षी शाहू महाराज यांच्या १४५ व्या जयंती सोहळा आज कोल्हापूरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्याचे महसुलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. यावेळी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ... वाचा सविस्तर