नवी दिल्ली -न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आलेल्या संत रविदास महाराज यांच्या मंदिरांच्या पुनः निर्माणासाठी नवी दिल्लीत रविवारी पून्हा निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी भीम आर्मीला मुस्लीम संघटनांचा देखील पाठिंबा मिळाला.
हेही वाचा... चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेचे अमरावतीत पडसाद; भीम आर्मीकडून मोदी सरकारचा निषेध
दिल्ली येथील तुघलकाबाद येथे असणारे सहाशे वर्षांपूर्वीचे गुरु रविदास यांचे मंदिर दिल्ली सरकारने तोडले आहे. चर्मकार समाजाचे आराध्य दैवत थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडले होते, हे मंदिर पुन्हा तिथेच निर्माण करावे, यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भीम आर्मी यांनी जोरदार संघर्ष केला आहे. यानंतर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांच्या सहित 95 लोकांना पोलिसांनी पकडले आहे.