महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आज..आत्ता.. रात्री १२ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या.. - marreged

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून कोसळधार सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून एका आठवडाभर हायअलर्ट जारी करण्यात आल्या आहेत. लोकलच्या गतीही मंदावल्या आहेत. मॉब लिंनिचंगबाबत आता अॅडमिनवर गुन्हा दाखल होणार आहे. ६ जणांना गंडा घालणाऱ्या एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आले आहे. मुंबईत मालमत्तेसाठी करात सूट मिळणार आहे.

आज..आत्ता.. (सोमवार १ जुलै २०१९ रात्री पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या)

By

Published : Jul 1, 2019, 11:54 PM IST

मुंबईत आठवडाभर हायअलर्ट; समुद्रात ४.७९ मीटर उंचीच्या उसळणार लाटा..!

मुंबई - मुंबईला गेले चार दिवस पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यात ३ दिवसात समुद्राला मोठी भरती आली नव्हती. मात्र, सोमवारी सकाळी समुद्राला मोठी भरती आली होती. आता २ ते ७ जुलैपर्यंत पुढील सहा दिवस सलग तसेच ३१ जुलैला ४.७९ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामुळे समुद्र किनारी नागरिकांनी आणि पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. .. वाचा सविस्तर

सलग चौथ्या दिवशी कोसळधार; पावसामुळे मुंबईची गती मंदावली

मुंबई - लांबलेल्या पावसाने मुंबईत दमदारपणे सुरुवात केली असून मागील चार दिवसांत ८५ टक्के इतका पाऊस झाला आहे. सलग चार दिवस पाऊस पडत असून सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रस्ते आणि रेल्वे सेवा कोलमडली. सायन, किंग्ज सर्कल रेल्वे रुळावर पाणी भरले होते. मुंबईतल्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूकही खोळंबल्याने मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईकर ऑफिसला उशिरा पोहचल्याने लेटमार्कही लागला. येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. .. वाचा सविस्तर

सावधान.! मॉब लिंचींगबाबत सायबर सेलचा सोशल मीडियावर वॉच, अॅडमिनवर होणार गुन्हा दाखल
जालना- मॉब लिंचींगप्रकरणी सायबर सेलने सोशल मीडियावर वॉच ठेवणे सुरू केले आहे. याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. तसेच अॅडमिनसह ती पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिला आहे. .. वाचा सविस्तर

लग्न करताय सावधान.. मॅट्रिमोनियल साईटवरून ६ जणांशी लग्न करून लाखोंना गंडा घालणाऱ्या प्राध्यापिकेला अटक

नागपूर- मँच मेकिंग या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून नागपुरात एका प्राध्यापिका महिलेने सहा जणांना फसवल्याचे उघड झाले आहे. सहा लग्न करून पतींकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या महिलेविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या टोळीत गुंड, डॉक्टर आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. समीरा उर्फ सीमा मुक्तार अहमद अन्सारी असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ती नागपूरच्या मोमीनपुरा येथील इस्लामिया हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहे. .. वाचा सविस्तर

खूशखबर.! मुंबईत 'या' घरांना मालमत्ता करात मिळणार सूट, विधानपरिषदेत विधयेक मंजूर
मुंबई- मायानगरीत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला आज विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या विधेयकामुळे मुंबई महापालिका परिसरातील तब्बल १८ लाख निवासी इमारतींना लाभ होणार आहे. .. वाचा सविस्तर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details