महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आज.. आत्ता.. रविवार २६ मे रात्री १२ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यावर एक नजर

मुंबईत कुर्ला रेल्वे स्थानकावर लोकल रूळावरून घसरल्याने मध्ये रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. यंदा राज्यात मान्सून एक आठवडा उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. शनि शिंगणापूरजवळ झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाचा ह्रदयविकाने मृत्यू झाला आहे. तर संतनगरी शेगावत भूत दिसल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

आज आत्ता

By

Published : May 27, 2019, 12:00 AM IST

LIVE: कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ लोकल रुळावरुन घसरली; मध्य रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द
मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर आज रात्री ९ वाजता लोकल रुळावरुन घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मध्य रेल्वेची वाहतुक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. जवळपास ५० पेक्षा अधिक गाड्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. अधिक वाचा...

उकाड्यापासून तुर्तास दिलासा नाहीच.. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, हवामान विशेषज्ञांचा अंदाज
मुंबई -
राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल संथ गतीने राहणार आहे. त्यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान ८ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता नाही. अधिक वाचा...

शनी-शिंगणापूरजवळ ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी
अहमदनगर -
मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अधिक वाचा...

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा.. हळद निघण्यापूर्वीच नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू
बीड -
अनेकजण आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर काय करायचे, कोठे फिरायला जायचे याचे नियोजन अगोदरपासूनच करत असतात. मात्र, लग्नानंतर चार दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अधिक वाचा...


CCTV : शेगावात दिसले भूत? तर्क-वितर्कांना आला ऊत
बुलडाणा -
जिल्ह्यातील शेगाव शहरात सध्या अंधश्रद्धेचे भूत फिरत असल्याची चर्चा आहे. आजच्या प्रगत जगात विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे भूत, जादुटोणा आणि पिशाच्च विद्या यासारख्या ‘वेडगळ समजुती’ काही प्रमाणात कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. मात्र, आजही अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकसुद्धा भूत, करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय सध्या शेगावात येत आहे.अधिक वाचा...

ABOUT THE AUTHOR

...view details