महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

व्हिडिओ : बिहारात पुराचा नवविवाहिताला फटका,  नववधूची पाठवणी एका ड्रमच्या होडितून - road

नवविवाहीत जोडप्याला पुरामुळे लग्नाच्या ठिकाणापासून घरी जाण्यासाठी एका ड्रमने तयार केलेल्या बोटेतून जावे लागले आहे.

नवविवाहीत जोडपे

By

Published : Jul 14, 2019, 5:13 PM IST

दरभंगा - एका नवविवाहीत जोडप्याला पुरामुळे लग्नाच्या ठिकाणापासून घरी जाण्यासाठी एका ड्रमने तयार केलेल्या बोटेतून जावे लागले आहे. बिहारमधील दरभंगा येथे ही घटना घडली.


बिहारच्या दरभंगा येथील एका नवविवाहीत जोडप्याला लग्न झाल्यानंतर आपल्या लग्नाच्या स्थळापासून घरापर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. रस्ता जलमय झाल्यामुळे ड्रम आणि लाकडाच्या फळ्यापासून बोट तयार करुन त्यात नवरदेव आणि नववधूला बसवून त्यांची पाठवणी करण्यात आली आहे.


आसाम, नेपाळ, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात जोरदार पावसामुळे पुर आला आहे. पुरामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत असून लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details