नवी दिल्ली - 'आपला शेजारी देश पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारताविरुद्ध त्यांनी छुपं युद्ध पुकारले आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबल्या नाही, तर भारताकडे 'स्ट्राईक' करण्याचा अधिकार असल्याचा इशारा नवनियुक्त लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानला दिला आहे'.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला उत्तर देण्यासाठी अनेक पर्याय भारताकडे आहेत. कोणताही हल्ला परतावून लावण्यासाठी भारत सज्ज असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा -मणिपूरमध्ये चार दहशतवादी ताब्यात..
मागील काही दिवसांपासून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढले आहे, याची जाणीव भारताला आहे. पाकिस्तानच्या बाजूने दहशतवाद्यांचे तळ असून ते भारतात येण्याच्या प्रयत्नात आहेत, मात्र, भारत पूर्णतहा: तयार असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले. दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांच्या व्यूहरचनेत योग्य ते बदल करण्यात येतात. तसेत पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचे नरवणे म्हणाले.
हेही वाचा -मऱ्हाठमोळे मनोज नरवणे लष्करप्रमुखपदी, आज स्वीकारला कार्यभार
जनरल नरवणे यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्याकडून लष्कराच्या प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी उप लष्करप्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता.