अहमदाबाद - देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून नवजात बालकांनाही कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. गुजरातमधील मेहसाना येथे सहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या जुळ्या बहीण-भावाला कोरोनाची लागण झाली आहे.
गुजरातमध्ये 6 दिवसांपूर्वी जन्मलेल्या जुळ्यांना कोरोनाची बाधा
गुजरातमधील मेहसाना येथे सहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या जुळ्या बहीण-भावाला कोरोनाची लागण झाली आहे. 18 मे ला मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर शुक्रवारी मुलीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यातील मोलीपूर गावातील गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेने 16 मे ला वंदेनगर शासकीय रुग्णालयात दोन जुळ्यांना जन्म दिला. बाळाची कोरोना चाचणी केल्यानंतर दोन्ही बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ही माहिती जिल्हा विकास अधिकारी मनोज यांनी दिली.
18 मे ला मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर शुक्रवारी मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुंबईहून परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण होती. त्या तिघांच्या माध्यमातून गावांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. तसेच मेहसानामध्ये एकूण 93 कोरोनाबाधित आहेत.