महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण - बाळाला कोरोनाची लागण

राजस्थानातील नागौरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रविवारी नागौरमध्ये 62 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला.

Newborn tests positive for COVID-19 in Rajasthan
Newborn tests positive for COVID-19 in Rajasthan

By

Published : Apr 20, 2020, 2:56 PM IST

जयपूर - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजस्थानातील नागौरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रविवारी नागौरमध्ये 62 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला.

बाळाच्या आई आणि वडिल आणि कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाबाधित आहेत. शनिवारी बाळाचा जन्म झाला होता. त्यानंतर आईला कोरोनाची बाधा असल्याने बाळाचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. रविवारी बाळाचा कोरोना अहवाल आला असून त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नागौरचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. सुकुमार कश्यप यांनी सांगितले.

नागौरमध्ये आतापर्यंत 59 लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर नागौरमधील 62 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. राजस्थानमध्ये एकूण 1 हजार 478 कोरोनाबाधित असून 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 हजार 265 झाला आहे, यात 14 हजार 175 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 2 हजार 546 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 543 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details