महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिंदु पद्धतीनं विवाहाचं विदेशी जोडप्याचं स्वप्न अधुरं, महिलेचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू - Paharganj news

हिंदु पद्धतीने विवाह करण्यास भारतात आलेल्या न्यूझीलंड येथील एका महिलेचा दिल्लीत मृत्यू झाला आहे. ही घटना पहाडगंज भागातील ताश्कंद हॉटेलमध्ये घडली. एन. ए पॉल( वय, ४९) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Nov 16, 2019, 3:54 PM IST

नवी दिल्ली- हिंदु पद्धतीने विवाह करण्यास भारतात आलेल्या न्यूझीलंड येथील एका महिलेचा दिल्लीत मृत्यू झाला आहे. ही घटना पहाडगंज भागातील ताश्कंद हॉटेलमध्ये घडली. एन. ए पॉल( वय, ४९) असे मृत महिलेचे नाव आहे. भावी पती ऑस्ट्रेलियातील तर महिला न्यूझीलंडमधील होती. या विदेशी जोडप्याला हिंदु पद्धतीने विवाह करायचा होता. मात्र, त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.

हृद्यविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महिला हिंदु रिती रिवाजानुसार लग्न करण्यासाठी भारतामध्ये आली होती. मध्य दिल्लीतील ताश्कंद हॉटेलमध्ये दोघे थांबले होते. लग्न झाल्यानंतर ते दोघेही परदेशात जाणार होते.

शुक्रवारी रात्री हॉटेलच्या खोलीमध्ये झोपलेली असताना महिलेच्या छातीमध्ये दुखू लागले. तसेच उच्च रक्त दाबाचा त्रासही होऊ लागला होता. औषधे घेतल्यानंतर त्या पुन्हा झोपल्या. मात्र, सकाळी त्या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. तत्काळ पॉल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटेनेची माहिती न्यूझीलंडच्या दुतावास कार्यालयाला देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हृद्यविकाराने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. पुढील तपास पहाडगंज पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details