महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुख्यात गुंडासोबत महिला कॉन्स्टेबलच्या लग्नात आता नवीन ट्वीस्ट

ग्रेटर नोएडात एका पोलीस महिलेने एका गँगस्टरसोबत विवाह केल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. महिलेने स्वतः आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले असून स्वतः गौतमबुद्ध नगरमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. परंतु या प्रकरणात आता नवीन ट्वीस्ट आले आहे. फोटोत दिसणारी महिला पोलीस विभागातच कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

कुख्यात गुंडासोबत महिला कॉन्स्टेबच्या लग्नात ट्वीस्ट

By

Published : Aug 13, 2019, 2:07 PM IST

Updated : Aug 13, 2019, 3:12 PM IST

नवी दिल्ली- ग्रेटर नोएडात एका पोलीस महिलेने एका गँगस्टरसोबत विवाह केल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर आता या प्रकरणात एक नवीन ट्वीस्ट आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता ही महिला कॉन्स्टेबल गौतमबुद्ध नगरमध्ये कोठेही कार्यरत नसून ती महिला पोलीस विभागातच कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

कुख्यात गुंडासोबत महिला कॉन्स्टेबलच्या लग्नात आता नवीन ट्वीस्ट

पोलिसांचे म्हणणे आहे, की आरोपीसोबत लग्न करताना दिसणारी आणि पोलीस वर्दीत दिसणारी महिला केवळ गौतमबुद्ध नगरमध्ये कार्यरत नाही. त्याचप्रमाणे ही महिला पोलीस विभागातच कार्यरत नसल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, ही महिला कोण आहे? कोठे राहते ? तसेच या महिलेने पोलीस गणवेश का घातले ? यासंदर्भात तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले आहे. तर केवळ सोशल मीडियात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे का ? यासंदर्भात अधिक तपास सुरु असल्याचे एसएसपी वैभव कृष्ण यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

नोएडामध्ये २०१४ साली मनमोहन योगल हत्याकांड झाले होते. याप्रकरणी कुख्यात अनिल दुजाना या टोळीचा सक्रीय सदस्य असलेला राहुल ठसराना तुरुंगात गेला होता. राहुल हा अनिल दुजानाचा विश्वासहार्य शुटर होता. याप्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयात हजर होण्यापूर्वी राहुलला न्यायालयीन परिसरातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. या कोठडीच्या संरक्षणाची जबाबादारी महिला कॉन्स्टेबलकडे होती. राहुल सुनावणीसाठी न्यायालयात यायचा तेव्हा त्यांची भेट होत होती. या दरम्यान त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. समाजाची पर्वा न करता त्यांनी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर या लग्नासंदर्भात महिलेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोलिसांचे गणवेश घालून फोटो शेअर केले होते. तसेच स्वतःला गौतमबुद्ध नगरमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Last Updated : Aug 13, 2019, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details