महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत सरकारने जारी केला देशाचा नविन नकाशा, नव्या रुपात जम्मू-काश्मीर, लडाख - लडाख

आज केंद्र सरकारने देशाचा नविन नकाशा जारी केला आहे.

नव्या रुपात जम्मू-काश्मीर, लडाख

By

Published : Nov 2, 2019, 7:24 PM IST

नवी दिल्ली -जम्मू-काश्मीर गुरुवारी ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून राज्य राहिले नसून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन झाले आहे. त्यानंतर आज केंद्र सरकारने देशाचा नविन नकाशा जारी केला आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख नविन रुपामध्ये पाहायला मिळत आहेत.


जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन झाल्यामुळे आता भारतात 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. नकाशा नुसार लडाखमध्ये कारगिल आणि लेह जिल्ह्यामध्ये सामिल होणार आहेत. तर जम्मू-काश्मीरमधील उर्वरीत जिल्हे केंद्रशासित प्रदेशाअंतर्गत येणार आहेत.


संसदेत ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आले होते. याच वेळी जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे विभाजन करण्याचे विधेयकही संमत झाले होते. यानंतर जम्मू-काश्मीरचे अधिकृतरित्या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details