नवी दिल्ली/काबूल - पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने (आयएसआय) इस्लामिक स्टेट ऑफ खोरासन प्रोविन्स या अफगाणिस्तान येथील दहशतवादी संघटनेला मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात डॉलरमध्ये पैसे पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयएसआयने याआधी हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांना मदत पुरवली आहे. बुधवारी टोलो न्यूज या माध्यमाने ‘देश-ए-अफगाणिस्तान' नावाचा माहितीपट प्रदर्शित केला. यामध्ये या बाबींचा उल्लेख आढळून आला आहे.
टोलो न्यूजच्या माहितीपटात पाकिस्तानचे खोरासन दहशतवादी संघटनेसोबत कनेक्शन उघड
‘देश-ए-अफगाणिस्तान' या माहितीपटामध्ये अफगानिस्तानचे नागरिक व त्यांचे होणारे हाल आणि दहशतवादी संघटनांचे जाळे याबद्दल सविस्तर दाखवण्यात आले आहे. तसेच आयएसकेपी ही अतिरेकी संघटना ही एक मोठ्या छत्रीप्रमाणे काम करत असल्याचे दाखवले आहे.
टोलो न्यूजच्या माहितीपटात पाकिस्तानचे खोरासन दहशतवादी संघटनेसोबत कनेक्शन उघड
‘देश-ए-अफगाणिस्तान' या माहितीपटामध्ये अफगाणिस्तानचे नागरिक व त्यांचे होणार हाल आणि अतिरेकी संघटनांचे जाळे याबद्दल सविस्तर दाखवण्यात आले आहे. आयएसकेपी ही अतिरेकी संघटना ही एक मोठ्या छत्रीप्रमाणे काम करते. ज्याअंतर्गत हक्कानी नेटवर्क, तेहरिक-ए-तालीबान आणि लष्कर-ए-तोयबा अशा दहशतवादी संघटना एकत्र येऊन काम करतात आणि अफगाणिस्तान सरकारविरोधात रणनिती आखत असल्याची माहिती अफगाणिस्तानचे सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांनी दिली.