नवी दिल्ली - सध्या चीन-भारत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपले सैन्यांना सीमेवर तैनात केले आहे. यातच दिल्ली विशेष पथकाने एक चिनी महिला, तिचा नेपाळी सहकारी आणि एका मुक्त पत्रकारास चीनसाठी हेरगिरी करण्यावरून अटक केली आहे. राजीव शर्माने असे या पत्रकाराचे नाव असून त्याने चिनी गुप्तचर संस्थांना देशाच्या सुरक्षेशी निगडीत संवेदनशील माहिती पूरवल्याचा आरोप दिल्ली पोलीस विशेष पथकाने केला आहे.
चीनला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी दिल्लीतील पत्रकारास अटक - राजीव शर्मा
दिल्ली विशेष पथकाने एक चिनी महिला, तिचा नेपाळी सहकारी आणि एका मुक्त पत्रकारास चीनसाठी हेरगिरी करण्यावरून अटक केली आहे. राजीव शर्माने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, फ्री प्रेस जर्नलमध्ये काम केले आहे.
राजीव शर्मा यांच्या घरातून पोलिसांनी वेगवेगळ्या नंबरचे मोबाईल, लॅपटॉप, इतर काही संवेदनशील गोपनीय कागदपत्रे हस्तगत केली आहेत. राजीव शर्मा हे पीतमपुरा भागातील रहिवासी आहेत, असे दिल्ली स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितले.
किंग शी आणि शेर सिंहने राजीव शर्मा यांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवल्याची माहिती आहे. राजीव शर्मा यांना 14 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. त्यांना 6 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. येत्या 22 सप्टेंबरला पटियाला हाऊस न्यायालयात जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. राजीव शर्माने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, फ्री प्रेस जर्नलमध्ये काम केले आहे.