नवी दिल्ली -भारतीय वायुसेनेचे (IAF) चीफ एअर चीफ मार्शल बी एस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सोमवारी मिग-21 हे लढाऊ विमान संयुक्तपणे चालवले. पठाणकोट येथील लष्करी हवाई अड्ड्यावरून त्यांच्या विमानाने भरारी घेतली.
हेही वाचा... गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...
पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला पाडल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांनी सोमवारी मिग विमानातून उड्डाण केले. पण यावेळी खास गोष्ट म्हणजे अभिनंदन यांनी हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धानोआ यांच्या सोबत हे उड्डाण केले.
हेही वाचा... चांद्रयान - २ : ऑर्बिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरित्या वेगळा
भारतीय वायुसेना प्रमुख हे देखील मिग -21 चे चालक आहेत. त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी 17 व्या पथकाचे नेतृत्व करताना विमाने उडविली होती. मात्र लढाऊ विमानात प्रवास करण्यासाठी धानोआ यांनी सोमवारी घेतलेली शेवटची भरारी होती.
हेही वाचा... जोतिरादित्य शिंदे यांच्या समर्थनार्थ ग्वाल्हेरमध्ये बॅनरबाजी
"आमच्या दोघांमध्ये दोन गोष्टी साम्य आहेत, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनी मिग विमान उडवले आहेत आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघांनीही पाकिस्तानशी लढा दिला आहे. मी कारगिलमध्ये लढा दिला आणि वर्धमानने बालाकोटनंतर लढा दिला. त्याच्या सोबत शेवटची भरारी करणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे," असे धानोआ यावेळी म्हणाले.
हेही वाचा... कुलभूषण जाधव यांना मिळणार कन्स्युलर अॅक्सेस, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नरमला
२ फेब्रुवारीला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी नियंत्रण रेखा ओलांडली आणि मिग -२१ या लढाऊ विमानामधून भारतीय हद्दीत दाखल झालेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानाचा पाठलाग करत पाकिस्ताचे लढाऊ विमान एफ -१ खाली पाडले होते. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल त्यांना नुकतेच वीर चक्र प्रदान करण्यात आले होते.
हेही वाचा... खासदार अर्जून सिंह यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून बराकपूरमध्ये १२ तासांचा बंद