नवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारातील सुरक्षा भेदत दुचाकी घेऊन संसदेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी केली असता या व्यक्तीकडे चाकू आढळून आला आहे. यानंतर या व्यक्तीला अटक करत पोलिसांनी त्याला संसद पोलीस ठाण्यात नेले आहे.