महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक! मुलगी जन्मताच तिला फेकले नाल्यात; दिल्लीतील खळबळजनक प्रकार - मृत अर्भक दिल्ली

मुलीचा जन्म होताच तिला नाल्यामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार मंगोलपूरी भागात घडला आहे. पोलिसांनी मृत अर्भकाचे शव इस्पितळात दाखल केले असून, पुढील तपास चालू आहे.

मुलीचा जन्म होताच तिला नाल्यामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार मंगोलपूरी भागात घडला आहे.

By

Published : Aug 4, 2019, 10:40 PM IST

नवी दिल्ली - मुलीचा जन्म होताच तिला नाल्यामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार मंगोलपूरी भागात घडला आहे. पोलिसांनी मृत अर्भकाचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले असून, पुढील तपास चालू आहे.

समाजात एका बाजूस स्त्री सक्षमीकरणासाठी प्रयत्न चालू असताना दुसरीकडे मुलींचा जन्म होताच त्यांना मारून टाकण्यात येत आहे. शहरातील मंगोलपुरी भागात पोलिसांना एका नाल्यामध्ये अर्भक आढळले. नाल्यातील डुक्कर मृत अर्भकाचा पाय खेचत असताना स्थानिकांनी पाहिले. यानंतर त्यांनी पोलिसांना सूचित केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना देशाची राजधानी दिल्ली येथे घडल्याने सर्वत्र रोष व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details