नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या दररोज ६० हजारांपेक्षा अधिकने वाढती आहे. गेल्या २४ तासांत देशात ६४ हजार ५५३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ७ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची इतक्या मोठ्या प्रमाणात वाढती संख्या ही चिंता वाढवणारी आहे. दरम्यान, या नवीन रुग्णांसह बाधितांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ झाली आहे.
देशात गेल्या २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोनाबाधितांची नोंद; १ हजार ७ जणांचा मृत्यू - कोरोना अपडेट लाईव्ह
देशात गेल्या २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या ६ लाख ६१ हजार ५९५ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १७ लाख ५१ हजार ५५६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण ४८ हजार ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना
देशात सध्या ६ लाख ६१ हजार ५९५ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत १७ लाख ५१ हजार ५५६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. एकूण ४८ हजार ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
देशात १३ ऑगस्टपर्यंत २ कोटी ७६ लाख ९४ हजार ४१६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ लाख ४८ हजार ७२८ या गेल्या २४ तासात करण्यात आल्या आहेत. इंडिया मेडिकल रिसर्च कौन्सिलकडून जारी करण्यात आली आहे.