भुबनेश्वर -ओडिशात 'फनी' चक्रीवादळाने आज सकाळपासूनच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर ११ लाख पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास ६९१ गर्भवती महिलांचाही समावेश होता. या धावपळीत एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग आला. चक्रीवादळावरून बाळाचे नावही फनी ठेवण्यात आले आहे.
ओडिशाला फनी वादळाने जोरदार झोडपले आहे. सकाळी ५ वाजल्यापासूनच किनारपट्टी भागात ताशी २४५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारा वाहत होता. गुरुवारपासूनच नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मदतीने हलवण्यात आले होते. याच धावपळीत एका महिलेची प्रसुती करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.