नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असून सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाची बाधा झालेले काही रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे होत आहेत. राजस्थानमधील नागौर येथील एका नवजात बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बाळाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सुखावणारी बातमी ! राजस्थानमध्ये नवजात बाळाची कोरोनावर यशस्वी मात
राजस्थानमधील नागौर येथील एका नवजात बाळाने कोरोनाला मात दिली आहे. बाळाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शहरातील अनुसार बासनी गावामध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली होती. कोरोनाचे संक्रमण झाल्याने त्याच्या गर्भवती पत्नीला विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. यावेळी महिलेने 15 एप्रिलला बाळाला जन्म दिला. महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बाळाचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. 20 एप्रिलला बाळाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरु केले.
बाळाला कोरोनामुक्त करणे हे डॉक्टरांसाठी मोठं आव्हान होतं. बाळाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारानंतर अखेर बाळाच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. बाळ आता पूर्णपणे बरं झालं असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. या बाळावर आणि त्याच्या आईवरही उपचार सुरु होते.