दिसपूर -नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले. यानंतर आसाममधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. अनेक विद्यार्थी संघटना आणि लोकांनी या विधेयकाचा निषेध केला. मध्यरात्रीपर्यंत हे आंदोलन सुरू होते. नॉर्थ ईस्ट विद्यार्थी संघटनेने (NESO) ईशान्येकडील राज्यांत या विधेयकाविरोधात १२ तासांच्या बंदची घोषणा केली आहे.
ईशान्येकडील राज्यांत नागरिकत्व विधेयकाचे पडसाद, १२ तासांचा कडकडीत बंद
नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले. यानंतर आसाममधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. अनेक विद्यार्थी संघटना आणि लोकांनी या विधेयकाचा निषेध केला.
ईशान्येकडील राज्यांत नागरिकत्व विधेयकाचे पडसाद
मंगळवारी सकाळापासून निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी टायर जाळून रस्ते बंद केले आहेत. या बंदचा सर्वाधिक परिणाम गुवाहाटीमध्ये जाणवत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेच्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
त्रिपुरामध्येही हे आंदोलन पसरले आहे.
Last Updated : Dec 10, 2019, 11:47 AM IST
TAGGED:
#CitizenshipAmendmentBill