नवी दिल्ली -भारत-नेपाळ सीमेवरील बिहारच्या जोगबनी शहरातून नेपाळकडे जाणाऱया ट्रकमधून भारतीय चलन नोटांमध्ये 1.9 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने मंगळवारी ही कारवाई केली.
भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी 1.9 कोटी रुपये जप्त केले - Indo-Nepal border
भारत-नेपाळ सीमेवरील बिहारच्या जोगबनी शहरातून नेपाळकडे जाणाऱया ट्रकमधून भारतीय चलन नोटांमध्ये 1.9 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
![भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी 1.9 कोटी रुपये जप्त केले Nepal Police seizes Rs 1.9 cr from truck at Jogbani Indo-Nepal border check-post](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7078906-688-7078906-1588740708656.jpg)
Nepal Police seizes Rs 1.9 cr from truck at Jogbani Indo-Nepal border check-post
पोलिसांनी ट्रक चालकासह एकाला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. भारत-नेपाळ सीमेवर व्यवहार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर नेपाळ पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आले होते. माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी सर्व वाहनांचा बारकाईने शोध सुरू केला होता.