काठमांडू- तुम्ही जर नेपाळमध्ये फिरायला जाणार असाल, तर जास्त पैसे मोजायला तयार रहा. कारण नेपाळ सरकारने परदेशात राहण्यासाठी लागणाऱ्या व्हिसा शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दहा वर्षांमध्ये या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली नसल्याने आता ही वाढ करण्यात आली आहे, असे सरकाच्या इमिग्रेशन विभागाने सांगितले.
व्हिसा शुल्कात करण्यात आलेली वाढ नाममात्र असून पुढील वर्षी राबवण्यात येणाऱ्या ' व्हिजीट नेपाळ २०२०' या पर्यटन अभियानावेळी पुन्हा शुल्कामध्ये बदल करण्यात येतील, असे इमिग्रेशन विभागाने एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले.