महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताच्या हद्दीत नेपाळच्या लष्कराकडून हेलिकॉप्टर तळाची उभारणी - कालापाणी सीमा वाद

भारतीय हद्दीतील कालापाणी परिसरात नेपाळी सैनिकांकडून छावणी उभारण्यात येत असून तेथे अनेक सैनिकांना हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले आहे. सीमेवरील नेपाळी सैनिकांच्या हालचालीही वाढल्या आहेत.

नेपाळ भारत सीमा वाद
नेपाळ भारत सीमा वाद

By

Published : Jun 24, 2020, 9:35 PM IST

पिथोरागड -नेपाळने भारतीय हद्दीतील भूप्रदेशावर नुकताच दावा केला आहे. तसा त्यांच्या नकाशात बदलही केला आहे. राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी नकाशा दुरुस्ती विधेयकावर सही केली असून त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी नेपाळी सैनिक भारतीय हद्दीतील भूप्रदेशावर हेलिकॉप्टर तळ (पॅड) उभारताना दिसून आले. या ठिकाणी सैनिकांकडून लष्करी छावणीही उभारण्यात येत आहे.

भारतीय हद्दीतील कालापाणी परिसरात नेपाळी सैनिकांकडून छावणी उभारण्यात येत असून तेथे अनेक सैनिकांना हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले आहे. सीमेवरील नेपाळी सैनिकांच्या हालचालीही वाढल्या आहेत. नेपाळने भारतीय हद्दीतील लिपूलेक, कालापाणी आणि लिंपियाधूरा हे भूप्रदेश त्यांच्या नकाशात दाखविले आहेत.

कृत्रिमरित्या सीमा वाढविण्याचा नेपाळचा प्रयत्न कधीही मान्य केला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालायने दिली आहे. जुना मित्र आणि शेजारी देशाशी सीमा वाद सुरु झाल्याने भारताची आणखी डोकेदुखी वाढली आहे.

नेपाळने मागील महिन्यात नवा राजकीय आणि प्रशासकिय नकाशा जारी केला आहे. त्यामध्ये भारतासाठी रणनितीकदृष्या महत्त्वाचे असलेले लिपूलेक, लिंपियाधूरा आणि कालापाणी हे भाग दाखविण्यात आले आहेत. नेपाळच्या लष्कर प्रमुखांनाही या भागाचा दौरा केला असून हवाई निरिक्षण केले. त्यामुळे चीन, पाकिस्तानसह नेपाळबरोबरही भारताचा सीमा वाद सुरु झाला आहे.

नेपाळमधील सीमेवरच्या काही जिल्ह्यांतील रेडिओ केंद्रांनी भारतविरोधी प्रचारही सुरु केला आहे. लिपूलेक, लिंपियाधूरा आणि कालापाणी हे भाग नेपाळचेच असल्याचा डांगोरा रेडिओद्वारे पिटण्यात येत आहे. सीमेवरील काही भारतीय गावांमध्येही नेपाळमधील रेडिओ केंद्रांची रेंज येते. त्यांनी नेपाळच्या या कृतीची माहीती स्थानिक प्रशासनाला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details