लातेहार (झारखंड) - एकेकाळी लाल दहशतीचा आकर्षण म्हणून ओळख असणारा लातेहार जिल्हा आता नवीन सकारात्मक बदलांची साक्ष देत आहे. झारखंडमधील विकासाच्या दृष्टीने मागासलेला हा जिल्हा शिक्षणाद्वारे नव्या पहाटेची पटकथाच लिहत आहे. मात्र, तरीही तो आजही चिंतेतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ऑनलाईनच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. मात्र, येथील या चिकमुकल्यांना पुरेशा सुविधा न मिळाल्यामुळे अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या जिल्ह्यात नेतरहाट येथे प्रसिद्ध सैनिकी शाळा आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी अजूनही दर्जेदार शिक्षणासून वंचित आहेत.
या जिल्ह्यात बंदुकीचे राज्य होते. लाल सलामच्या जाळ्यात अडकून अनेक वृद्ध आणि तरुण त्यांचे जीवन उद्ध्वस्त करत होते. नक्षलवादामुळे अनेक दशके लातेहारचा विकास झाला नाही. मात्र, जेव्हा येथील गावकऱ्यांना शिक्षण हेच उद्धाराचे एकमेव माध्यम आहे हे समजले तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली.
जिल्ह्यात जवळपास 1 हजार 234 शाळांमध्ये जवळपास 1 लाख 49 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि शाळा बंद झाल्यामुळे, उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या या मुलांचा अभ्यासच बंद पडला. पर्याय म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरु केला. मात्र, या मागासलेल्या जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांजवळ स्मार्ट फोनच नाही. तर ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहे त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांना सामना करावा लागत आहे. यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.
ना फोन ना इंटरनेट... ऑनलाईन अभ्यास करायचा तरी कसा? याबाबत पालकांनीही सोयीसुविधा न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. यासर्व समस्यांवर विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मार्गदर्शन करणे एकमेव उपाय आहे. शिक्षकांनी हे कबूल केले की ते असे करत आहेत. मात्र, शिक्षकांनी असेही कबूल केले की ते सर्व विद्यार्थांना भेटू आणि शिकवू शकत नाही. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनाही वाटतेय की ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी मुलांमधील दरी आणखी वाढली आहे.
लातेहार जिल्हा शिक्षण विभागाची एक वेगळीच कथा आहे. त्यांना हेही माहित आहे की 73 ट्क्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेण्यास सक्षम नाहीत. तरी ते असा सुनिश्चित करतील मुलांच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ते हे कसे करतील या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही.