नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार ही सर्व नेहरू घराण्याची देण आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. मेरठ येथे एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
'बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण', साध्वी प्राचीचे वादग्रस्त विधान - PRACHI SADHWI
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारताला जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले होते. या वक्तव्यावरून प्राची यांनी राहुल गांधीवर टीका केली. देशामध्ये नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार हे सर्व नेहरूंच्या कुटूंबामुळेच होत असल्याचे त्या म्हणाल्या.
याचबरोबर त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. अखिलेश सत्तेत असताना बलात्कार करणाऱ्याची पाठराखण करतात, असे त्या म्हणाल्या.
साध्वी प्राची यांनी हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींचे एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे कौतूक केले. उन्नाव प्रकरणावर उत्तर प्रदेश पोलिसांनी अशीच कारवाई केली पाहिजे , असे त्या म्हणाल्या.