पाटणा - संपूर्ण देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. यासाठी सर्वत्र उपाययोजना सुरू असतानाच गर्दनीबागमधील सिव्हिल सर्जन कार्यालयाबाहेर हलगर्जीपणाचे उदाहरण समोर आले आहे. या कार्यालयाबाहेरील रस्त्यावर कोरोना संबंधित पीपीई किट्स फेकून देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यामधील काही पॅकेट्स फोडलेले होते, तर काही सीलबंद अवस्थेत आढळले.
तक्रारीनंतर देखील कारवाई नाही
हा प्रकार अनेक दिवसांपासून होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नगरपालिकेला याबाबत तक्रार करून देखील कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. सिव्हिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी यासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
काय आहे पीपीई किट?
बिहारमध्ये वापरलेले पीपीई किट्स रस्त्यावर; रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस कोरोनाबाधितांचा उपचार करणारे डॉक्टर्स या पीपीई किट्सचा वापर करतात. त्याच्या वापरानंतर संबंधित किट्स आयजीआयएमएस येथे डंप करण्यात येते. हे कोणत्याही ठिकाणी अथवा उघड्यावर फेकल्यास त्यापासून संक्रमणाचा धोका वाढतो. मात्र आता आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.