महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NEET परीक्षेचा निकाल जाहीर, ओडिशाच्या शोएबला पैकीच्या पैकी गुण - नीट निकाल संकेतस्थळ

नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ओडिशातील शोएब अफताब या विद्यार्थ्याने ७२० पैकी ७२० गुण मिळविले आहेत.

NEET
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 16, 2020, 8:07 PM IST

Updated : Oct 16, 2020, 8:27 PM IST

नवी दिल्ली -नॅशनल इलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ओडिशातील शोएब अफताब या विद्यार्थ्याने ७२० पैकी ७२० गुण मिळविले आहेत. nta.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

१३ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे. ५० पर्सेंनटाईल आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी पास समजले जाणार आहेत. मात्र, वैद्यकीय आणि दंतमहाविद्यालयात मेरीट आधारित प्रवेश मिळणार आहे.

'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' नीटची परीक्षा आयोजित करते. विद्यार्थ्यांना ntaneet.nic.in या संकेतस्थळावरून निकाल डाऊनलोड करता येणार आहे. अनुक्रमांक, जन्मातारीख तसेच सुरक्षा पीन निकाल पाहण्यास अनिवार्य आहे. एमबीबीएस/ बीडीएस/ बीव्हीएस/ आयुष/ एएच या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेत.

Last Updated : Oct 16, 2020, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details