नवी दिल्ली - आरोग्य मंत्रालयाने ओडिशामध्ये नीट (NEET) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा आज (५ मे) होणार होत्या. फनी चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये मोठा विध्वंस झाला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून सामाजिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, वीज, टेलिकॉम सेवा प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
'फनी' चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे 'नीट' (NEET) परीक्षा पुढे ढकलल्या - postpone
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर आणि पूरी येथील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. शासकीय बीएसएनएलसह एअरटेल, व्होडाफोन यांनी सेवा खंडित झाल्याचे सांगितले आहे.
ओडिशामध्ये मोठा विध्वंस
ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश येथील परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर आणि पूरी येथील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. शासकीय बीएसएनएलसह एअरटेल, व्होडाफोन यांनी सेवा खंडित झाल्याचे सांगितले आहे. जनजीवन पूर्ववत करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना कॅबिनेट सचिवांनी सर्व संबंधितांना आणि राज्य सरकारला दिल्या आहेत.