रांची - देशभरातील विविध राज्यात अडकलेल्या ३ लाख नागरिकांनी माघारी राज्यात परतण्यासाठी नोंदणी केली आहे. या सर्वांना कोणतीही दिरंगाई न करता माघारी आणण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले. कामगारांना रेल्वेद्वारे माघारी आणण्यासाठी केंद्र सरकार राज्यांकडून १५ टक्के रक्कम वसूल करत आहे, त्यावरून सोरेन यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
'झारखंडमध्ये माघारी परतण्यासाठी ३ लाख नागरिकांची ऑनलाईन नोंदणी' - झारखंड मजूर बातमी
'श्रमिक स्पेशल' रेल्वे गाड्यांतून कामगारांना माघारी येण्याआधीच झारखंड राज्य पैसे जमा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
'श्रमिक स्पेशल' रेल्वे गाड्यांतून कामगारांना माघारी येण्याआधीच झारखंड राज्य पैसे जमा करत असल्याचे त्यांनी सांगितले. झारखंड राज्यातून रेल्वेला मोठा महसूल मिळत असतानाही आम्हाला रेल्वेने कोणतीही सूट दिली नाही. ज्यांना कोणाला माघारी यायचे आहे, त्या सर्वांना माघारी राज्यात आणले जाईल, त्यांच्या घरापर्यंत पोहचविले जाईल, असे सोरेन म्हणाले.
स्थलांतरित मजूरांना माघारी आणण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत २० हजार कामगार आणि विद्यार्थ्यांना माघारी आणण्याचे सोरेन यांनी सांगितले. चार-पाच दिवसांपूर्वी ऑनलाईन नोंदणी सुरू केल्यानंतर ३ लाख कामगारांनी माघारी येण्यासाठी नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले.