महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एनडीआरएफ, सुरक्षा दलाच्या जवानांना राखी बांधत पूरग्रस्तांनी मानले आभार - karnataka floods

पूर ओसरला असल्याने जवान परत आपल्या कॅम्पकडे निघाले आहेत. त्यामुळे महिला आणि मुलींनी जवानांना राख्या बांधून त्यांचे आभार मानले.

राखी

By

Published : Aug 13, 2019, 8:19 PM IST

चिकमंगळुरु- पूरग्रस्तांना मदत करुन एनडीआरएफ टीम आणि सुरक्षा दल आता परतत आहेत. सैन्याने केलेल्या मदतीची आठवण ठेवत कर्नाटकच्या चिकमंगळुरुमधील मुदिगिरी तालुक्यातील महिला आणि मुलींनी जवानांना राख्या बांधून आभार मानले आहेत.

जवानांना राखी बांधत पूरग्रस्तांनी मानले आभार

पूर परिस्थिती गंभीर बनल्याने एनडीआरएफ पथक आणि सुरक्षा दल यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना मदत केली. आता पूर ओसरला असल्याने जवान परत आपल्या कॅम्पकडे निघाले आहेत. यावेळी स्थानिकांनी कृतज्ञ मनाने जवानांना निरोप दिला. तसेच महिला आणि मुलींनी जवानांना राख्या बांधत आभार व्यक्त केले. दरम्यान, स्थानिकांच्या या पाहुणचाराने जवानही भारावले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details